घारगावच्या पोलिस ठाणेतील दचाकी वाहनांचा लिलाव संपन्न...... संगमनेरचे पोलिस उपधिक्षक राहुल मदने यांनी केले बोलीचे तिनवार..

संगमनेर/सार्वमंथन वृत्तवेध
संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाणेत दुचाकी स्कॅर्प वाहनांचा लिलाव संपन्न झाला यामधे तब्बल ५३ वाहनांचा लिलाव करण्यात आला.
तर ५२ लिलाव धारकांनी सहभाग घेतला होता.
घारगाव पोलिस ठाणेत बेवारस असलेल्या वाहनांच्या लिलाव प्रक्रीयेत पोलिस निरिक्षक सुनिल पाटील यांनी सर्व नियम व अटी लिलाव धारकांना वाचुन दाखवुन लिलावास सुरवात केली यामधे आर टि ओ कार्यालयातुन आलेल्या मुल्यंकन दिल्या नुसार १लाख ६४ हजार ६०० रूपये सर्व वाहनाची रक्कम ठरविण्यात आली होती.
या लिलाव प्रसंगी संगमनेर पोलिस उपधिक्षक राहुल मदने,घारगाव पोलिस ठाणेचे पोलिस निरिक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला 
लिलावास पहिली बोली राहुरीचे संजय प्रकाश जाधव यांनी लावली तर या नंतर अनेकांनी लिलावात सहभाग घेतला होता.सदर लिलावातीव ५३ वाहने नगर येथिल भंगारचे व्यापारी सलिम भाई यांनी २ लाख १५ हाजारास घेतला या लिलावात संगमनेर,श्रीरामपुर,कोल्हार,लोणी,आळेफाटा,भिंगार,शेंडी,अहमदनगर,ओझर,राहाता,राहुरी साकुर नगर, श्रीगोंदा ,बेलापुर, कोपरगाव, शिरुर,महालगाव,पुणे,औरांगाबाद, बुलढाणा अदि ठिकाणच्या भंगार वाल्यांनी सहभाग घेतला .यावेळी पोलिस हवालदार विखे, पोलिस.नाईक पोलिस हवालदार खैरे ,लाड यांनी नियोजन केले.


Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....