उद्योजकाने महाराजांना दिले व्हिलचर

राहुरी/ सार्व मंथन वृत्तसेवा
 राहुरी फॅक्टरी येथील उद्योजक नरेंद्र चव्हाण व सुधीर पठारे यांच्या वतीने वाघाचा आखाडा येथील दोन्ही पायाने दिव्यांग असणारे ह.भ.प. साहेबराव जाधव यांना नवीन  व्हीलचेअर देण्यात आली.
नरेंद्र चव्हाण मित्र मंडळ सामजिक बांधिलकी जोपासत समाजातील दिव्यांगासाठी काम करत असतात. या वेळी चव्हाण यांनी सांगितले की, असे काही समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आम्ही कधीही माघे राहणार नाही. आमचा सहभाग नेहमीच राहील. यावेळी राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त सांगितले की,  आपल्या राहुरी तालुक्यात दिव्यांगांसाठी सहकार्य करणारे बऱ्याच संघटना आहेत त्याचे कायमच सहकार्य असते .कोरोणा काळात सर्वांच्या सहकार्यामुळे 250 दिव्यांगांसाठी जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. वाघाचा आखाडा येथील मंदिरातील पुजारी साहेबराव जाधव दोन्ही पायाने दिव्यांग आहे ते 20 वर्षापासून मंदिरात सेवा करतात. त्यांना कोणीही नातेवाईक नाही. आज पर्यत त्यांना कोणता शासकीय लाभ घेता आला नाही. कारण त्यांना  रेशनकार्ड नव्हते प्रहार संघटनेच्या पदाधिकारी मधुकर घाडगे व वाघाचा आखाडा येथील बाळासाहेब तनपुरे सर व ग्रामस्थांनी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांची भेट घेतली. त्यानी तत्काळ रेशनकार्ड दिले. त्यामुळे त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र नगर सिव्हिल हॉस्पीटल मधून काढून आणले त्यांचे  बँक खाते उघडले असून आता संजय गांधी योजनेचा लाभ मिळून देणार आहे. आता त्यांना प्रहार संघटना व ग्रामस्थ याचे सहकार्य मिळाले आहे. यावेळी आदिनाथ तनपुरे म्हणाले की, आमच्या गावातील मंदिराची स्वच्छता ठेवतात .गावातील ग्रामस्थ त्याच्या जेवण, कपडे, औषध उपचार करतात. साहेबराव जाधव यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष योगेश लबडे, संघटक सुरेश दानवे, तालुका सचिव रवी भुजाडी, वाघाचा आखाडा येथील माऊली कटारे, किशोर दौड, शरद तनपुरे, प्रवीण तनपुरे व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन बाळासाहेब तनपुरे सर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....