नोकरीला लावुन देतो म्हणुन बीडच्या महाराजासह पाथर्डीच्या दोन शिक्षकाने राहुरीच्या पोस्ट खात्यातील सेवा निवृत्त कर्माचारयाची 5 लाखाची केली फसवणुक...पोलिसात होणार गुन्हा दाखल...

राहुरी-पाथर्डी /सार्वमंथन वृत्तवेध.
राहुरी येथील पोस्ट खात्यातील सेवा निवृत्त कर्मचारयाच्या मुलाला शिक्षण शिक्षण संस्थेत नोकरी लावुन देतो असे म्हणुन ५ लाखाला फसविल्याचा प्रकार समोर आला असुन याबाबत लवकरच पोलिसात गुन्हा होणार आहे.संबंधिताची फसवणुक झाल्या बाबत सर्व पुरावे पोलिसांनी देणार असल्याचे सेवानिवृत्त कर्मचारयाने सांगितले आहे. 
सेवा निवृत्त कर्मचारी हे शेवगाव येथे पोस्ट विभागात 
कर्माचारी होते.
त्यांना बीड येथिल मठातील एका महाराजाने काही शिक्षकांना हाताशी धरून संस्थेत शिक्षकाची नोकरी लावून देतो म्हणून एका सेवानिवृत्त पोस्टातील कर्मचाऱ्याला ५ लाखाला गंडा घातला असल्याचे समजले आहे..
येथील पोस्टखात्यातील सेवानिवृत्त ढगे नामक व्यक्तीने आपल्या मुलाला नोकरीला लावण्यासाठी मठातील महाराज , कदम व जायभाय नामक शिक्षकांना ढगे यांनी आपल्या मुलाला नोकरी लागावी म्हणून पाच  लाख रुपये 2017 साली दिले.. आज नोकरी लावतो उद्या लावतो पुढच्या महिन्यात लावतो थोडे थांबा नियोजन चालु आहे,असे म्हणुन चाल ढकल पणा केला .तसेच  वारंवार  दिलेल्या रकमेची मागणी करूनही संबंधित शिक्षक जायभाय व कदम यांनी ते पैसे महाराजांनी आमच्याकडून घेतले आमचा काही संबंध नाही असे सांगून संबंधित वृद्धाला दमबाजी केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार झाला आहे.
यामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी ची भूमिका घेतली असता त्यांना ही त्या जायभाय नामक शिक्षकाने अरेरावी केल्याचेही समजले असून लवकरच त्या "महाराज" कदम आणि जायभाय नामक शिक्षकावर राहुरी येथे गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते.
यामधे नागनाथ भक्त महाराज व दोन शिक्षकांचा समावेश आहे. 
                              (चौकट)
या त्रिकुटांवर पिंपळगावच्या टप्प्यात  नागनाथांच्या नावाने एक विद्यालय (शाळा) भरवली आहे,
मात्र येथे विद्यार्थीच नाही हे महाशय निव्वळ शासनाचे अनुदान लाटण्यासाठी हा प्रकार करत असुन शिक्षण विभागाला बदनाम करण्याचा हा प्रकार असुन या त्रिकुटांवर पोलिसात लवकरच गुन्हा दाखल होणार? 
 


Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....