राहुरी तालुक्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या स्वयम् अर्थसहाय्यित शाळा संस्थाचालकांची सहविचार सभा खेळीमेळीत पार...
राहुरी/सार्व मंथन वृत्तसेवा
राहुरी तालुक्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या स्वयम् अर्थसहाय्यित शाळा संस्थाचालकांची सहविचार सभा खेळीमेळीत पार...
राहुरी तालुक्यातील सर्व इंग्रजी व मराठी माध्यमाच्या स्वयं अर्थ सहित शाळा संस्थाचालकांचे नुकतीच सहविचार सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सर्वानुमते अष्टविनायक स्कुल चे श्री. मोहिणीराज होन सर यांची निवड करण्यात आली सभेच्या प्रमुख विषयांपैकी एक सर्वप्रथम तालुका कार्यकारणीची स्थापना करण्यात आली ज्यामध्ये ज्ञानवर्धिनी स्कूल गुहाचे ज्ञानदेव शेलार यांची अध्यक्ष, सौ बनकर मॅडम यांची उपाध्यक्ष तर सचिवपदी अष्टविनायक स्कूल तांदुळवाडीचे मोहनीराज होन यांची सचिव तसेच ग्लोबल स्कूल राहुरीचे प्रा. रामकृष्ण ढोकणे सर यांची सहसचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीत स्वयं अर्थसहाय्यित शाळांना कोरोना काळात आलेल्या विविध आर्थिक अडचणी, शासनाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच 25% आर टी ई ऍडमिशन प्रतिपूर्ती ही गेल्या चार वर्षापासुन दिली गेली नाही. शासन स्तरावरुन कुठल्याही हालचाली दिसत नाही, या कोविड 19 च्या काळामध्ये या प्रतिपुर्ती रक्कम शाळांना संजीवनी सारखी लाभदायक ठरणार आहे. गेल्या जुलै 2020 पासुन आहोरात्र काम करणा-या शिक्षकांचे पगार थकलेले आहेत, त्यांच्या विझलेल्या चुली पुन्हा जिवंत करण्याचे काम ही प्रतीपुर्ती करेल, हक्काचे शाळांचे आर टी ई 25% पैसे मिळावे यासाठी व पुढील शैक्षणिक वर्षासाठी असणा-या आर टी ई प्रवेशावर राहुरी तालुका स्वयंअर्थसाय्यीत शाळांनी आर टी ई प्रतीपुर्ती जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत बहिष्कार टाकला आहे. असे निवेदन राहुरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुर्यवंशी साहेब यांना निवेदन देण्यात आले. याबाबत शासनाची असलेली उदासीनता याबाबत चर्चा बैठकीत करण्यात आली या बैठकीस बाळासाहेब वाणी स्कूल चे दत्तात्रय वाणी, शिवांकुर विद्यालय कोंढवड चे डाॅ.प्रकाश पवार, श्रद्धा सेमी इंग्लिश स्कूल से सिकंदर शेख, ज्ञानदीप स्कूलचे बाळासाहेब दातीर, नोबेल चे स्वप्नील माने, आरोही स्कुलचे दत्तात्रय काकडे सर, पठारेसर, संस्कृती फौंडेशन चे अभिजित तनपुरे, लिटल फ्लॉवर चे भाऊसाहेब वाघ सर, गुरुकुल चे भगवान करपे, रवीनंदन स्कूलचे अशोक बानकर सर,आर्य चे कृतवर्मा जाधव सर, ग्लोबल किड्स स्कूल देवळाली प्रवराचे सचिन कोठुळे आदी शाळा संचालक उपस्थित होते.
Comments
Post a Comment