देवळाली प्रवरा येथील नियोजित पोलीस ठाण्याच्या जागेची अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांच्याकडून पाहणी

राहुरी \सार्वमंथन मंथन वृत्तवेध
 दि. १५ मार्च देवळाली प्रवरा येथील नियोजित पोलीस ठाण्याच्या जागेची आज सोमवार  दि. १५ मार्च २०२१ रोजी स. ११.०० वा. श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मॅडम यांनी पाहणी केली. 
देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मिती साठी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक डॉ प्रताप दिघावकर, श्रीरामपूर चे आमदार लहुजी कानडे यांची वेळोवेळी भेट घेऊन तसेच राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहून देवळाली प्रवरा येथील स्वतंत्र पोलीस स्टेशन प्रश्नी केलेल्या पाठपुराव्याला आज काही अंशी यश आले. 
आप्पासाहेब ढुस व शिस्टमंडळाने केलेल्या मागणीनुसार विधानसभेत आमदार लहूजी कानडे यांनी अधिवेशनात नुकताच प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने आज  श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे  यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचेसह देवळाली प्रवरा येथील नवीन पोलीस ठाण्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जागेंची पाहणी केली. या मध्ये देवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरी रस्त्यावर इरिगेशन बंगला येथील सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहा लगत असलेल्या जागेची पाहणी केली.  देवळाली प्रवरा नगरपरिषदे जवळील पोलीस खात्याच्या जागेवर थोड्याच दिवसात रेडिमेड पोलीस चौक्या ठेवून ती जागा पोलीस खात्याच्या वाहिवाटीत आणली जाईल आणि  सार्वजनिक पाटबंधारे विभागाचे जागेवर नियोजित पोलीस ठाण्याच्या प्रस्ताव लवकरच तयार करून मंजुरीसाठी सादर केला जाईल असे या भेटी दरम्यान अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे  यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्या शी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....