राहुरीत घर मलाकाला न सांगता मावशी घर घुसली कशी घुसली तर म्हणे माझे घर आहे........ती मावशी कुठली?

राहुरी/सार्वमंथन वृत्तवेध
बिल्डींगमधल्या खोलीवर कब्जा करुन एका ' मावशी'ने कोरडे नावाच्या वृद्धाला पोलिसात छेडछाडीची खोटी तक्रार देवून तुला जेलमध्ये बसविल , अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे . याप्रकरणी राहुरी शहरात तनपुरे गल्ली भागात राहणारे विजय रंगनाथ कोरडे , वय वर्ष ८० यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी महिला सुभद्रा उर्फ (मालन मावशी) दगडू वाढेकर , हल्ली रा.मल्हारवाडी रोड , कोरडे बिल्डींग , राहुरी हिच्याविरुद्ध भादवि कलम ४५४ , ४५२ , ४४८ , ३२३ ,५०४ , ५०६ प्रमाणे गु.र.नं २४८ दाखल करण्यात आला असून विजय कोरडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की ,  ४ च्या सुमारास आरोपी महिलेने माझी मालकीची मिळकत लुबाडण्यासाठी माझ्यामालकीचे मिळकतीमधील कोरडे बिल्डींग येथील चौथ्या मजल्यावरील दक्षिण बाजूची पूर्वेकडील २ नंबर खोलीस मी लावलेले कुलूप माझे संमतीशिवाय तोडून घरात अनाधिकृतरित्या प्रवेश करुन वास्तव्य करीत असल्याने याबाबत सुभद्रा उर्फ मालन मावशी हिच्याकडे कोरडे यांनी विचारणा केली असता मालन मावशी म्हणाली की , तुझा मला बोलायचा काही एक संबंध नाही , ही जागा माझी आहे . मी येथेच राहणार आहे . तुला काय करायचे ते कर , असे म्हणून शिवीगाळ करुन धक्काबुद्धी केली व खोलीतून हाकलून दिले . तू परत येथे आला तर तुझ्याविरोधात छेड छाड केल्याबाबत खोटी तक्रार करुन तुला जेलमध्ये बसविल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले असून पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गर्शनाखाली पो.ना खंडागळे हे पुढील तपास करीत आहेत.गुन्हा दाखल होताच  चालख मावशी पसार झाली होती मालकाची विनापरवानगी  न घेता एका महिलेने चक्क घरात घुसखोरी केल्याने भाडोत्री  रुम देणारया मालकामधे चांगलीच खळबळ उडाली आहे.
पोलिस यावर काय कारावाई करतात याकडे पिडी वृद्धाचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....