राहुरीत रस्त्यालगत तरुणीच्या डोक्यात दगड घालुन खुन/हातावर लिहले सितल बोटावर लिहले S P..पोलिस छडा लावत आहे,

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवाफोटो- अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे,पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके, पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे,पोलिस उपनिरिक्षक गणेश शेळके अदि दिसत आहे.
डोक्यात घातलेला दगड,
घटनेच्या ठिकाणी पोलिस पथक मृतदेह तपासणी करतांना 


राहुरी कारखाना नगर मनमाड रोड लगत गुंजाळ नाक्याजवळ चिंचविहीरे हाद्दित एका २१ ते २४  वर्षिय अज्ञात तरुणीच्या डोक्यात दगड घालून निघृण हत्या करण्यात आल्याची घटना आज दि.१५ रोजी पहाटेच्या दरम्यान घडली आहे.
अज्ञात सदर घटनेमुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली असुन पोलिस खुन करणारयाचा छडा लावत आहे.
घटनेच्या ठिकाणी  रक्ताने माखलेला एक मोठा दगड, मयत तरुणीचे  नकली कानातील व डोक्याची क्लिप असे आढळुन आले आहे.
घटनेची माहिती कळताच अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे,पोलिस उपधिक्षक संदिप मिटके,पोलिस निथिक्षक हनुमंत गाडे,पी एस आय गणेश शेळके,निलेशकुमार वाघ, मधुकर शिंदे,पोलिस कॉन्स्टेबल , उत्तरेश्वर मोराळे , दिनेश आव्हाड ,जानकीराम खेमनर , अण्णासाहेब चव्हाण , जालिदंर साखरे, वैभव साळवे,गृहरक्षक दलाचे सचिन पवार ,यासह श्वान पथक ठसे तज्ञ,फाॅरेन्सिक लाॅब घटनास्थळी दाखल झाले होते.
काल दि.१४ मार्च ( रविवारी ) मध्यरात्रीच्या दरम्यान खूनाची घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 
राहुरी कारखाना गुंजाळ नाक्या लगत  गिते वस्तीच्या रस्त्यावर नगर - मनमाड महामार्गापासून काही अंतरावर  तरुणीचा मृतदेह पडलेला होता.
येथिल स्थानिक शेतकरी विशाल गिते यांचे पोल्ट्रीसाठी मध्यरात्री दोन वाजता कोंबड्यांचे  खाद्याचे वाहन येणार होते .ते पाहण्यासाठी गिते रस्त्याकडे दुचाकीवर चालले होते . दुचाकीच्या उजेडात त्यांना मृतदेह दिसला अहता ते सुरवातीस घाबरले  त्यांनी षेजारीराहमारे देशमुख यांनी माहिती दिली नंतर रस्त्याने फिरत असलेल्या पोलिसांच्या गस्ती पथकाला थांबवुन हि माहिती दिली .
मृत तरुणीच्या अंगावर पंजाबी ड्रेस , नारंगी रंगाची सलवार व गर्द आकाशी रंगाचा कुर्ता आहे . डाव्या हातावर मनगटाच्या खाली इंग्रजी अक्षरात " शितल " व डाव्या हाताच्या अंगठ्या खाली इंग्रजीत " एस.पी. " असे गोंदलेले आहे.तसेच डिलेवरी च्या वेळी ज्या पोटावर खुना उमठतात तश्या पोटावरती ऑपरेशनच्या खुना आहेत.
पोलिस सुत्राकडुन मिळालेल्या माहिती नुसार सदर तरुणीचे हि मध्येम वर्गिय कुटूंबातील असुन तीच्या तळ पायच्या निशानी वरुन असे दिसते,तालुक्याच्या ग्रामिण भागातील दिसुन येते,अद्याप या मयत तरुणीची ओळख पटली नसुन पोलिस पथक नगर मनमाड रोड लगतच्या लाॅज व हाॅटेलच्या तपासणी करत आहे.
याबाबत राहुरी पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुधात खुनाचा गुन्हा नोंदविला असुन घटनेचा तपास पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे,
                              (बाॅक्स)

अहमदनगर जिल्ह्यात खुन,दरोडा,लुटमार,धुम स्टाईल गंठण पळवणे, दारु, जुगार,मटका,बिंगो,लाल काळे पत्ता,सावकारकी,ढाबे लाॅजवर सुरु असलेला वैश्य व्यवसाय,यासह गुन्हेगारी निर्माण होत असलेला धंदा म्हणंजे वाळु तस्करी,अदि अवैध व्यवसाय सुरु असुन यावर निर्बंध कोण घालणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. 
              

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....