राहुरीतील विद्यामंदिर शाळे जवळील चप्पल दुकान व्यापारयास जातीवाचक शिविगाळ पोलिसात गुन्हा दाखल...आरोपी अद्याप पसार
राहुरी/ सार्वमंथन वृत्तवेध
राहुरी शहरात विद्यामंदिर शाळे लगत चप्पल दुकान व्यापारयास तिघांनी जातिवाचक शिविगाळ करत दमबाजी केल्याची घटना घडली असुन पोलिस ठाणेत याबाबत अनुसुचित जाती जमाती नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अद्याप आरोपींना अटक झाली नसल्याचे पोलिस सुत्राकांडुन समजले आहे.
राहुरी शहरातील विद्यामंदीर शाळा जवळ चप्पलच्या दुकान गाळ्याच्या जून्या भिंतीची डागडूजी करत असताना दुकान मालक साखला यांना बिहाणी बंधुनी येवुन जातिवाचक शिविगाळ करण्याचा प्रकार घडला आहे.
जातीवाचक शब्द वापरल्याने तिघां बिहाणी बंधुवर अनुसूचित जाती जमाती कायदा कलम नूसार गुन्हा दाखल करण्यात आला . राहुरी शहरातील विद्यामंदीर शाळे जवळ साखला फुट वेअर नावाचे दुकान आहे.
या दुकानचा मालक मिलिंद नंदकिशोर साखला हे दिनांक २६ मार्च रोजी विद्यामंदीर शाळे जवळील साखला फुट वेअर दुकानाच्या पाठीमागील भिंतीची डागडुजी करत होते . यावेळी १ ) सुरज सतिष बिहाणी २ ) मनोज अशोक बिहाणी ३ ) अनुप अशोक बिहाणी सर्व रा . राहुरी बु . ता . राहुरी हे त्या ठिकाणी आले . आणि फिर्यादी व त्याचा भाउ मनोज यास तुम्ही भिंतीची डागडुजी करावयाची नाही असे म्हणाले . यावेळी मिलिंद साखला त्यांना म्हणाला की , भिंत ही फार जुनी झाली आहे . तिची डागडुजी केली नाहीतर ती केव्हाही पडेल .
त्यामुळे आमच्या घरातील एखाद्याचा जीव जावु शकतो . असे म्हणाला असता याचा त्यांना राग आल्याने त्यांनी फिर्यादी व त्याचे भावास शिवीगाळ करु लागले.
त्यावेळी सुरज सतिष बिहाणी हा फिर्यादीस म्हणाला . भिंत पडुन तुम्ही चांभारडे मेले तरी चालतील . आम्हाला काहीच फरक पडणार नाही .असे म्हणून फिर्यादी व त्याच्या भावास आम्ही तुम्हाला पाहुन घेवू अशी धमकी दिली.
मिलिंद नंदकिशोर साखला याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत १ ) सुरज सतिष बिहाणी २ ) मनोज अशोक बिहाणी ३ ) अनुप अशोक बिहाणी या तिघांवर अनुसूचित जाती जमाती कायदा कलम नूसार गुन्हा दाखल करण्यात आलाय . या घटनेचा पुढील तपास संगमनेर येथील उप विभागीय अधिकारी राहुल मदने हे करीत.
सदर प्रकार हा भरपेठेत झाल्याने या भागात बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती.एका व्यापारयास या प्रकारे शिविगाळ झाल्याने व्यापारी वर्गात संताप व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment