शिवजयंती निमित्त राहुरीत विविध कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मोत्सव समिती व शिव प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर..
राहुरी /सार्वमंथन वृत्तसेवा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राहुरी शहरात शिवजन्मोत्सव समिती राहुरी तालुका यांच्या वतीने शिव प्रतिमा पुजन, रक्तदान शिबीर, कॅन्सर ग्रस्त रूग्णाला आर्थिक मदत या सारख्या विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची महिती शिवजन्मोत्सव समिती संयोजकांची दिली आहे.
राहुरी तालुका शिवजन्मोत्साव समितीच्या वतीने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन कोरोना महामारीमुळे तसेच शासकीय नियमाचे पालन करून रोटरी ब्लॅडबँक मध्ये शिव प्रतिमा पुजन, रक्तदान शिबीर, राहुरी खुर्द येथील कॅन्सरग्रस्त मुलाला आर्थिक मदत या सारखे सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते सकाळी 10 वाजता शिव प्रतिमेचे पुजन करण्यात येणार आहे. त्यानंतर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजन्मोत्सव समितीचे शिवाजीराव डौले, हर्ष तनपुरे, अनिल गावडे, अॅड. राहुलभैय्या शेटे, मच्छिंद्र गुंड, डॉ. प्रकाश पवार, राजेंद्र खोजे,पत्रकार रमेशराव बोरूडे, कांता तनपुरे, अतुल तनपुरे, प्रदिप भुजाडी, डॉ. सचिन मुसमाडे, सचिन बोरूडे, सचिन ठुबे, सुनिल तनपुरे, अमीत भुजाडी, चंद्रशेखर झावरे, संदिप आढाव, सचिन वराळे, गोरक्षनाथ अडसुरे, अशोक तुपे, मनोज खुळे, गोपी लांबे, आबा शेटे, देवेंद्र जाधव, राजेंद्र गुंजाळ, सचिन जाधव, शरद म्हसे, रविंद्र चौधरी, नरेंद शिंदे, सचिन शेटे, रविंद्र तनपुरे, आप्पासाहेब ढोकणे, राजा भोरे, संकेत दुधाडे, मयुर कल्हापुरे, संदिप गागरे, कैलास कोहकडे, शरद तनपुरे, प्रसाद घाडगे तसेच नगर जिल्हा मराठा महासंघ, शिव प्रतिष्ठान, संभाजी बिग्रेड, संत सावता माळी युवक संघ तसेच शिवप्रेमी संघटना प्रत्नशील आहे.
Comments
Post a Comment