भीम आर्मीच्या जिल्हाअध्यक्षपदी राहुरीचे तानसेन बिवाल यांची नियुक्ती..

 राहुरी /सार्वमंथन वृत्त
भीम आर्मीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी तानसेन बिवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
औरंगाबाद येथे झालेल्या कार्यकारिणीच्या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांसह  तानसेन बिवाल यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संघटक दिपक भालेराव यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मीत प्रवेश केला. भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अँड. चंद्रशेखर आझाद यांच्या कामावर प्रेरित होऊन आपण भीम आर्मीत प्रवेश केला असून अहमदनगर जिल्ह्यात यापुढे भीम आर्मीचा मोठ्या प्रमाणात विस्तार करणार असल्याचे तानसेन  बिवाल यांनी यावेळी सांगितले. प्रसंगी भीम आर्मीचे राष्ट्रीय कोअर कमिटीचे सदस्य दत्तुजी मेडे, अशोक कांबळे, उत्तेश्वर कांबळे, राहुल भाग, सिताराम गंगावणे, आदी प्रमुखांसह गुलशन बिवाल, सतीश चक्रे, सचिन जगणे, बबन जगधने, सनी चव्हाण, जितू चव्हाण, शिवम बिवाल, करण बुबूक आदी उपस्थित होते.तानसेन बिवाल यांच्या निवडीबद्दल सर्व क्षेत्रात अभिनंदन होत आहे.
तानसेन बिवाल हे कायम.सामाजिक,सांस्कृतिक, धर्मिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत भीम आर्मीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड औरागाबाद येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....