किरकोळ कारणातुन राहुरीत एकाच्या डोक्यात फोडली बाटली...
राहुरी/सार्वमंथन वृत्त
तू येथे उभा का राहीला. असे म्हणत निलेश शेजवळ यांच्या डोक्यात बाटली फोडून जखमी केले. तसेच लाथाबूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे घडली. याबाबत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
निलेश बाळासाहेब शेजवळ हे दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे असताना त्या ठिकाणी आरोपी दत्तात्रय माळवदे व गोट्या माळवदे हे दोघे दारू पिऊन आले. आणि निलेश शेजवळ यांना म्हणाले कि, तू येथे उभा का राहीलास. तेव्हा निलेश शेजवळ म्हणाले कि, मी दुकानात आलो होतो. आता घरी चाललो आहे. आरोपींना याचा राग आल्याने दत्तात्रय माळवदे याने नीलेश शेजवळ यांच्या डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केले. तसेच गोट्या माळवदे याने शिवीगाळ करून लाथा बूक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.
निलेश बाळासाहेब शेजवळ यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय माळवदे व गोट्या माळवदे या दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक वैभव साळवे हे करीत आहेत. घटने नंतर आरोपी हे पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
Comments
Post a Comment