संत शिरोमणी गुरू रविदास महाराज जयंती शासकीय स्तरावर साजरी व्हावी.
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
संपूर्ण भारत देशात व विदेशात समतेचा संदेश देणारे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची जयंती दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमा राबवून मोठ्या उत्साहात साजरी होत असते.
परंतु सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शनिवार, दि. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी संत रोहिदास महाराज यांची जयंती समस्त चर्मकार समाज अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात शासकीय आदेशानुसार शासकीय, निम-शासकीय कार्यालयात आदी सर्व ठिकाणी संत शिरोमणी गुरू रविदास महाराज जयंती साजरी होत असते. त्याअनुषंघाने राहुरी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात अधिकारी, व कर्मचारी यांच्यासह चर्मकार संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राहुरी तालुका चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आले आहे. सदरील निवेदन महसूल, कृषि, पंचायत समिती, नगरपालिका आदी शासकीय कार्यालयांना देण्यात आले.
निवेदनावर चर्मकार विकास संघाचे राहुरी तालुका युवा अध्यक्ष कैलास वाघमारे, उपाध्यक्ष गणेश कानडे, राहुरी तालुका सचिव राजु उदमले, राहुरी शहराध्यक्ष बाळकृष्ण वाघ, किरण घनदाट, महिला तालुकाध्यक्षा सौ. सुरेखा देवरे आदींच्या सह्या आहेत.
Comments
Post a Comment