जाळ्यात आडकवुन बिबट्याचा मृत्यु.

राहुरी/सार्वमंथन वृतसेवा
तालुक्यातील गोटुंबा आखाडा परिसरात बाबासाहेब सखाराम शेटे यांच्या उसाच्या शेतात लोक वस्तीपासून सुमारे २०० फुटाच्या अंतरावर दिड वर्षे वयाच्या नर बिबट्याचा डाव्या पायाला जाड तारांचा फास लागून मुत्यु झाल्याची घटना घडली आहे . ऊसतोड सुरू असताना दि .२२ फेब्रुवारी २०२१ रोजी ऊसतोड कामगारांच्या ही बाब लक्षात आली . १ एप्रिल २०२० ते १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात तालुक्यातील ग्रामीण भागातून ३०८ उपस्थित पाळीव प्राण्यांची शिकार झाली आहे . शासनाकडून दोन.. दोन वर्षे मोबदला मिळत नाही.अशा वेळी शेतकरी सुरु राणडुकरे व इतर जंगली प्राण्यापासुन पिकाचे नुकसान होऊ नये म्हणुन शेतकरी शेतीच्या बांधाला बाईंडींग ताराचे फासे व सरळ तारा बांधतात . त्यामुळे त्यात वन्य प्राणी अटकतात . शेती शेतकऱ्यांच्या घरापासुन लांब असल्यामुळे त्याकडे कुणाचे वेळीच लक्ष जात नाही , अशा वेळी बिबट्यासारख्या जंगली प्राण्यांचे जीव जातात असाच एक प्रकार घडला असल्याचे गोटुबा आखाड्यावरिल लोकांनी वनविभागाला कळविले त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी वनमंडळ आधिकारी परदेशी , वनपाल निकम व वनरक्षक मोरे घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी मृत बिबट्यास ताब्यात घेऊन पंचनामा केला . यावेळी वनपरिक्षेत्र आधिकारी महादेव पोकळे उपस्थित होते . बिबट्या कुणी मारला ? फास कुणी लावला होता? , या बाबतचा तपास वन विभागामार्फत सुरु आहे . वन विभाग याबाबत काय कार्यवाई करते व कुणाला जबाबदार घरते याकडे तालुक्यातील लोकांचे लक्ष लागले आहे . ही घटना तिन ते चार दिवसांपूर्वीच घडली असल्याचे पशूधन विकास अधिकारी डॉ .वैभव वाकडे यांनी सांगितले आहे . 

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....