छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला राज्य सरकारने परवानगी द्यावी. - देवेंद्र लांबे


राहुरी/सार्वमंथन वृत्त
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महारांजांचा सोमवार दिं १९ फेब्रुवारी रोजी होणारया
जयंतीला रितसर परवानी द्यावी अन्यथा मराठा समाज्या रोषाला समोरे जावे लागणार असल्याचा शिवजंयती समितीच्या वतिने इशारा देण्यात आला आहे. 
आज सोमवार दि.८ रोजी राहुरी तहसिल येथे शिवजयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी प्रांताधिकारी श्री.जगताप साहेब व तहसिलदार श्री.शेख साहेब यांच्याशी  १९ फेब्रुवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करणे बाबत भेट घेवून मा.मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे कि, सालाबादा प्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत “छत्रपती शिवाजी महाराज” यांची जयंती निमित्त “१९ फेब्रुवारी २०२१” रोजी पालखी मिरवणूक व लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याच्या विचारधीन आहोत.
परंतु कोरोंना रोगाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या वतीने जमाव बंदीचे आदेश दिलेले आहेत असे समजते.सध्या कोरोंना रोग नियंत्रणात आल्याचे निदर्शनात येत आहे.तसेच मोठ्या प्रमाणावर सामाजिक व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी घेतले गेले जात आहेत.
त्या कारणाने मुख्यमंत्री यांनी  शिवशंभू प्रेमीच्या भावना लक्षात घेऊन “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जयंती निमित्त होणार्‍या कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी मराठा बहुऊद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा अ.भा.छावाचे जिल्हाकार्याध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती करण्यासाठी सरकारने रितसर परवानगी द्यावी.शिवप्रेमींच्या भावनेचा सहानुभूती पूर्वक विचार करावा.राजकीय पक्षांचे कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवून घेतले जातात.यावेळी कुठलेही शासकीय यंत्रणा नियमांनवर बोट ठेवत नाही.फक्त सर्वसामान्य जनतेलाच काही सामाजिक उपक्रम घ्यायचे आसल्यास नियम दाखवून कायद्याचा धाक दाखविला जातो.सरकारने वेळीच येणाऱ्या १९ फेब्रुवारी २१ ला होणाऱ्या शिवजयंती उत्सवला रितसर परवानगी द्यावी.अन्यथा सरकारला शिवजयंती उत्सव समिती,मराठा एकीकरण समिती ,अखिल भारतीय छावा संघटना व शिवशंभु प्रेमिंच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
या प्रसंगी शिवश्री देवेंद्र लांबे ,मराठा एकीकरण समितीचे कायदेशीर सल्लागार ॲड.तुषार भुजाडी अॕड.अमोल डौले ,उपाध्यक्ष राजेंद्र लबडे ,महेंद्र शेळके ,दिनेश झावरे ,सोमेश्वर गाडे ,अविनाश क्षिरसागर  आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....