राहुरी फाॅक्टरी दहशत मुक्त करा सर्व पक्षियांची मागणी
राहुरी/सार्वमंथन वृत्त
राहुरी फाॅक्टरी व देवळली प्रवरेतील गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांचा तसेच अवैध धंद्याचा बंदोबस्त करावा यामागणीसाठी राहुरी फाॅक्टरी देवळाली नाका येथे सर्वपक्षियांच्या वतिने अंदोलन करण्यात आले होते.
जर कोणी येथिल व्यापारयांना दमबाजी करण्याचे काम केले तर कायदा हातात घेवुन त्यांना ठोकुन काढण्यात येईल असा इशारा देवळालीचे नगध्यक्ष सत्यजित कदम यांनी अंदोलन प्रसंगी दिला.
राहुरी फाॅक्टरी येथे सर्व पक्षियांच्या वतिने अंदोलन प्रसंगी ते बोलत होते.
राहुरी फाॅक्टरी परिसरात अवैध व्यवसाय विरोधात अंदोलन करण्यात आले होते.
काही दिवसापुर्वी गुंड प्रवृत्तीच्या पाच सहा जणांच्या पैसे न दिल्याने टोळक्यांनी एका व्यापारयास भर रस्त्यावर पट्ट्याने मारहाण करण्यात आली होती.
तसेच एका फळविक्रेताला दमबाजी करत खंडणी मागण्याचा प्रकार झाला यासह चोरीच्या घटना घडत आहे.सर्व सामन्य नागरीकांना तसेच व्यापारयांना कायमचाच त्रास होत आहे. तसेच काही तरुणाकडे गावठी कट्टे शोध घेतल्यास पोलिसांना ते मोठ्या प्रमाणात सापडतील अशा गुंडाचा बंदोबस्त करावा या मागण्या अंदोलन दरम्यान नगरध्यक्ष सत्यजित कदम,शांतीचौक मिक्ष मंडळ अध्यक्ष दिपक त्रिभुवन, रफिक शेख अदिंनी केल्या आहेत.
यावेळी पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे म्हणाले की ज्या दिवशी आम्हाला सर्व पक्षियांनी निवेदन दिले त्याच दिवशीपासुन याठिकाणी दोन पोलिस कर्मचारी चौकात नेमवले आहे. तसेच कोणतेही अवैध व्यवसाय सुरु असतील तर ते बंद करण्यात येईल, तसेच कोणी दमबाजी करतील त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, जर तसा कोणी प्रयत्न करत असेल तर पोलिस प्रशासन त्यांची दादागिरी मोडीत काढु, घाबर नका कोणी त्रास देत असेल तर पोलिस प्रशासन जनतेच्या पाठिशी आहे तसेच काही अनुचित प्रकार किंवा घटना घडल्यास जनतेने पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान केले.
यावेळी शांती चौक मित्र मंडळ,राजे छत्रपती मित्र मंडळ,शिवतेज मित्र मंडळ,वैष्णव चौक मित्र मंडळ,यासह सर्व पक्षिय पदाधिकारी सामिल झाले होते.
दिपक त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली अंदोलन छडण्यात आले होते.
या अंदोलनात सुरेश लोखंडे,सुनिल विश्वासराव,प्रशांत काळे,प्रदिप गरड,संदिप कदम,अदिनाथ कराळे,डाॅ संदिप मुसमाडे,सचिन सरोदे ,आण्णा साहेब चोथे,हर्षद ताथेड,दत्तात्रय साळुंके,प्रकाश सोनी,रावसाहेब मुसामडे,दत्तात्रय दरंदले,पिनु झावरे,भागवत मुंगसे,चारुदत्त पवार,शिवाजी आप्पा कपाळे,नंदु साळवे,जयेश मुसमाडे,प्रशांत मंडारी मुस्ताक पठाण,प्रविण पाळंदे,वेद पाठक,बाबासाहेब कणसे,दिविदास कोठुळे,शाम पाटेकर,किरण गायके,विश्वजित भडके,सतिष संसारे,ललित चोरडिया,तयनुर पठाण,सुरेश चव्हाण,संदिप मुसमाडे,वैभव गाडे,गणेश शेजुळ,चांगदेव पवळे,उध्दव राउत,परशुराम मोरे,मनोज वाघ अदि व्यापारी,नागरीक सर्व पक्षिय पदाधिकारी सामिल झाले होते.
सदर निवेदन पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे व नायब तहसिलदार गणेश तळेकर यांनी स्विकारले
(चौकट)
राहुरी फाॅक्टरी परिसरातील काही चौकात गुंडाचा कायम नंगानाच सुरु असतो,तसेच येथिल प्रसाद नगर ,गुहा फाटायासह आजु बाजुच्या काही गावातील गुंडाचा कायम येथिल नागरीकांना व व्यापारयांना त्रास असतो याचां बंदोबस्त करावा.......
सामाजिक कार्यकर्ते सरेश लोखंडे
(चौकट)
व्यापार्याना व नागरीकांना कोणी खंडणी मागत असेल तसेच दमबाजी करत असेल तर त्यांनी घाबरुन न जात पोलिसांशी संपर्क करावा किंवा मला फोन करावा त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल ......
पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे,
Comments
Post a Comment