पोलिसात दिलेली केस मागे घे नाहि तर तुझा बेत बघु
राहुरी/सार्वमंथन वृत्त
राहुरी पोलिस ठाण्यात दाखल केलेली केस मागे घे. नाहीतर तूझा बेत पाहू. असे म्हणून गोरक्षनाथ मेहेत्रे यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना ११ फेब्रुवारी रोजी घडली असून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गोरक्षनाथ भोजराज मेहेत्रे यांची मुलगी दिपाली मेहेत्रे हिने शेतीच्या वादावरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून राहुरी पोलीस ठाण्यात दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी सफिक शेख व इतर लोकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी सफिक शेख हा फरार असून त्याला अद्याप अटकपुर्व जामीन मंजूर झाला नाही. त्यामुळे दिनांक ११ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी तौफिक सफिक शेख व तौकिर सफिक शेख दोघे राहणार खाटीक गल्ली, राहुरी बुद्रुक. हे गोरक्षनाथ मेहेत्रे यांच्या घरासमोर गेले. आणि गोरक्षनाथ मेहेत्रे यांना म्हणाले कि, माझ्या वडिलांचा जामीन मंजूर होत नाही. तू केस मागे घे. नाहीतर तूझा बेत पाहू. असे म्हणत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. गोरक्षनाथ भोजराज मेहेत्रे यांनी ताबडतोब राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आणि तौफिक सफिक शेख व तौकिर सफिक शेख दोघे राहणार खाटीक गल्ली, राहुरी बुद्रुक या दोघांविरुद्ध शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ हे करीत आहेत.
Comments
Post a Comment