देवळाली ग्रामिण रुग्णालय प्रश्नी मंत्रालयात लवकर बैठक.आप्पासाहेब ढुस

देवळाली प्रवरा/सार्वमंथन वृत्तसेवा
देवळाली प्रवरा येथे खास बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळणे कामी सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात यावी यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांना पत्र लिहून विनंती केली आहे. 
महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष व समन्वय समितीच्या वतीने देवळाली प्रवरा येथे खास बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळणे कामी आरोग्य मंत्रालयास शिफारस करावी या मागणीसाठी समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी समितीच्या सदस्यांसह सिस्टमंडळाने राहुरी येथे राज्यमंत्री प्रजक्तदादा तनपुरे यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन दिले होते.   
 आप्पासाहेब ढुस यांचेसह उपाध्यक्ष तथा डॉ केमिस्ट चे चेअरमन डॉ. विलास पाटील, कोशाध्यक्ष्य तथा राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, सचिव तथा योग प्रशिक्षक किशोर थोरात, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब खांदे, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष केदारनाथ चव्हाण, सदस्य तथा देवळाली प्रवरा शहर शिवसेना पक्षाचे अध्यक्ष सुनीलभाऊ कराळे आदींनी स्वाक्षरी करून दिलेल्या निवेदनावर  राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंत्रालयात संबंधितांची बैठक बोलावणेची आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांना पत्र लिहून विनंती केली आहे. 
राज्यमंत्री प्रजक्तदादा तनपुरे यांचे विनंतीस मान देऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब लवकरच सर्व संबंधितांची बैठक बोलावतील व देवळाली प्रवरा येथे खास बाब म्हणून सर्व सुविधांनी युक्त असे अद्यावत ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देतील व  देवळाली च्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागेल  असा विश्वास आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....