भंपकवाडी' या वेबसिरीजच्या पोस्टरचा अनावरण सोहळा चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांच्या हस्ते संपन्न


देवळाली प्रवरा/सार्वमंथन वृत्त

राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील चैतन्य उद्योग समूह यांच्या सौजन्याने व नटेश्वर कला, क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने निर्मिती होणाऱ्या भंपकवाडी' या वेबसिरीजच्या पोस्टरचा अनावरण सोहळा चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांच्या हस्ते व 'चेन्नई एक्स्प्रेस' या हिंदी चित्रपटातील दाक्षिणात्य अभिनेते विजय जॅस्पर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

 ग्रामीण जीवनात घडणाऱ्या गमती-जमतीमधून सामाजिक संदेश देणाऱ्या 'भंपकवाडी' या वेबसिरीजचे लेखन व दिग्दर्शन रणजित लहारे करणार असून उद्धव वाघ व प्रमोद पवार हे निर्माते असून झिंग मराठी यु ट्यूब चॅनलवर या वेबसिरीजचे प्रसारण होणार आहे.

यावेळी गणेश दादा भांड म्हणाले की पूर्वी चित्रपट म्हणले की मुंबई,पुणे हेच लोक डोळ्यासमोर यायचे परंतु आता ग्रामीण भागातील कलाकार या क्षेत्रात पुढे येत आहे. ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

  यावेळी  उपस्थित सर्व कलावंतांनी गणेश दादा भांड हे कला क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी नेहमी सहकार्याची भूमिका घेऊन पाठबळ देत असल्याने त्यांचे आभार मानले.

 या कार्यक्रमास रणजित लहारे, उद्धव वाघ, प्रमोद पवार, पत्रकार रफिक शेख, आकाश येवले,नाट्य अभिनेते राजेंद्र क्षीरसागर, प्रशांत सूर्यवंशी,राजेश मंचरे, संजय हुडे , शेखर लहारे, प्रमोद पंडित, श्री.आगलावे, नारायण माळी, राधाकिसन ठोंबरे, संभाजी मेढे, अशोक ठोंबरे, साईनाथ शेटे, अमोल कुर्हे, सुरेश देवरे, सौ.पवार, सौ.लहारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र क्षीरसागर यांनी केले तर आभार ऋषिकेश राऊत यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....