साखर कारखान्याच्या माजी चेअरमनच्या पुत्रावर पाणी चोरीचा गुन्हा.
राहुरी/सार्वमंथन वृत्तवेध
डॉ.बा.बा.तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन यांच्या मुलाने चोरुन पाण्याची पाईप लाईन घेतल्या बाबत राहुरी पोलिस स्टेशनला चोरुन पाणी घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल रावसाहेब साबळे राहणार रामपुर सोनगाव रोड ता. राहुरी असे चोरुन पाणी वापरणाऱ्याचे नाव आहे.
गावातील पाणी योजनेतून पाणीचोरी करणाऱ्याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात रामपुरच्या महिला ग्रामसेवकाने गुन्हा दाखल केला असुन सदर घटनेने राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
राहुरी तालुक्यातील रामपूर येथे ग्रामपंचायत मार्फत गावाला शासकीय पाणीपुरवठा होत असलेल्या मुख्य जलवाहिणीला वंन्डर पाईप जोडून स्वताचे फायदयाकरीता शासकीय पाण्याची चोरी झाली असल्याची गुन्हा र.जि 175/2021 भा द वी कलम 379,430 प्रमाणे फिर्यादी प्रतीभा गोरक्ष भरसाकळ वय वर्षे -34 धंदा नोकरी ( ग्रामसेवक रामपुर ग्रामपंचायत कार्यालय राहुरी जि अहमदनगर दिनांक 3 ,फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 1/35 वा ते दिनांक 03/02/2021 रोजीचे पुर्वीपासुन वेळ नक्की माहीत नाही साबळे राहात असलेल्या रामपुर सोनगाव रोड जवळ घरा जवळ पाण्याची पाईप लाईन चोरुन घेतली.
घटनेचा तपास पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. संजय राठोड हे करीत आहे.
साखर कारखान्याच्या एका माजी चेअरमनच्या पुत्राने हि करमत केल्याने तालुक्यात चर्चेला उधान आले आहे.
Comments
Post a Comment