देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याचा पुनरप्रस्ताव सादर करा - पोलीस महासंचालक डॉ प्रताप दिघावकर*

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा 
देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मीतीची मागणी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे यांनी
 पोलीस महा संचालक  डॉ प्रताप दिगावकर यांचेकडे गुरुवारी  राहुरी येथे केली असता देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याचा पुनरप्रस्ताव सादर करा अश्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक यांना डॉ दिघावकर यांनी दिल्या. 
 देवळाली प्रवरा येथे ४२ गावांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करावे तसेच पोलीस खात्याच्या स्व मालकीच्या जागेवरील आरक्षण हटवावे या मागणी साठी ढुस व घाडगे यांनी आज राहुरी येथे पोलिस महा संचालक डॉ दिगावकर साहेब यांची समक्ष भेट घेतली. 
      राहुरी पोलीस ठाणे अंतर्गत ९५ गावे असलेने पोलीस प्रशासनावर कामाचा ताण पडतो यामुळे राहुरी पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन देवळाली प्रवरा स्वतंत्र पोलीस ठाणे होणे जरुरीचे असल्याचे ढुस यांनी सांगितले. 
     जिल्ह्यातील अन्यत्र ठिकाणी पोलीस ठाण्याचे विभाजन झाले असल्याचेही ढुस व घाडगे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले व त्या पद्धतीने देवळाली प्रवरा साठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मितीसाठी पुनर्र प्रस्ताव सादर करण्याच्या जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील साहेब यांना डॉ  दिघावकर यांनी सूचना दिल्या. 
     या प्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके  व अन्य वरिष्ठ पोलीस अधीकारी पत्रकार अनिल कोळसे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....