मोतीबिंदु शिबीरात एव्हड्यांच्या शस्त्रक्रिया - डॉ. गिरगुणे
*मोतीबिंदु शिबीरात २१ शस्त्रक्रिया - डॉ. गिरगुणे*
राहुरी/सार्वमंथन वृत्त
डॉ. विखेपाटील मेमोरियल हॉस्पीटल व रामकृष्णहरी क्लीनीक, बारागाव नांदुर यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी घेण्यात आलेल्या शिबीराचे उदघाटन बिरोबाचे भगत हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राहुरी नगरपालीकेचे उपनगराध्यक्ष श्री सुर्यकांत भुजाडी हे होते
पाहुण्यांचे स्वागत व परिचय अक्षय गिरगुणे यांनी केले
या मोतीबिंदु शिबीरात डॉ . विलय पारेख, डॉ. मृणालिनी नाईक, डॉ. अमृता दायगुडे यांनी नेत्रतपासणी करून २१ पेशंट शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले तर कर्णरोगाचे ३० पेशंट तपासण्यात आले याची तपासणी डॉ.प्रभाकर वावरे यांनी केली .
या शिबीरात राणु सरोदे, रोहिदास दातीर, अशोक कोहकडे, भाऊसाहेब पटेकर, अशोक मंडलीक, मयुर भोकरे, सिद्धार्थ नागपाल, वैभव गिरगुणे आदि मान्यवर उपस्थित होते.
शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. चंद्रकांत गिरगुणे यांनी केले
Comments
Post a Comment