*अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी घराघरातून होत असलेल्या निधी संकलनाचे कार्य हे आनंद देणारे आहे`- महंत रामगिरी महाराज*
- Get link
- X
- Other Apps
राहुरी /सार्वमंथन वृत्त
पू. गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहात प्रत्येक भाविकाचे योगदान असावे म्हणून घरोघरी भाकरी गोळा केल्या जातात , त्यानेसर्वाना समाधान लागते तशाच पद्धतीने अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी घराघरातून होत असलेल्या निधी संकलनाचे कार्य हे आनंद देणारे आहे , असे प्रतिपादन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले .
राहुरीतील शनी मारुती मंदिरामध्ये श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलनाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते . महंत रामगिरी महाराज म्हणाले की , मंदिर या शब्दात मंगलता दिव्यता आणि रम्यता असून , हा शब्द व्यापक स्वरूपाचा आहे . रामाचा अर्थ आनंद असून सिता म्हणजे शांती आहे , शांती तेथे आनंद आहे.अयोध्येत प्रभू रामचंद्र असून रामचरित्राचा आदर्श आजच्या पिढीने घेण्याची आवश्यकता आहे . घराघरातून झालेल्या निधी संकलनातून अयोध्येत भव्य व दिव्य राम मंदिर उभे राहणार आहे . प्रत्येकाने यात योगदान दिल्याने याचा सर्वांना आनंद होत आहे ,असेही ते म्हणाले.
प्रारंभी महंत रामगिरी महाराज यांनी मारुती , शनी महाराज यांचे पूजन केले . यावेळी उत्तर नगर जिल्हा मोठा निधी संकलन सहप्रमुख चंद्रशेखर कदम, जिल्हा संघचालक भरत निमसे यांच्या उपस्थितीत शहरातील मान्यवरांनी निधी समर्पणाचे धनादेशअभियान प्रमुखांना दिले . शेवटी किरण कोरडे यांनी पसायदान म्हटले . डॉ. रामकिसन ढोकणे यांनी अभियानाची माहिती दिली. प्रशांत कोठुळे यांनी अनुभव कथन केले. शेवटी किरण कोरडे यांनी पसायदान म्हटले . अभियानाचे राजेंद्र भुजाडी , हेमंत बंड , सखाराम महाराज पिसे, संजय महाराज म्हसे , तसेच रामभक्त नागरिक उपस्थित होते .

Comments
Post a Comment