मटन बनविण्याचा कारणातुन आईचा खुन करणारा आरोपी राहुरीच्या जलमधे मयत झाला...मयत झाल्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात...

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील आईला ठार मारल्याच्या गुन्हेत दोन वर्षापासून शिक्षा भोगणारा राहुरीच्या जेलची हवा खात असलेला आरोपी राजेंद्र गोविंद लांडे वय वर्ष ४६ याचा अकस्मात मृत्यू  झाल्याची घटना काल मध्यरात्री  घडली आहे.
आरोपी राजेंद्र लांडे यास रात्री दोन वाजे दरम्यान पोटात त्रास जाणवु लागल्याने त्याला राहुरी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असते तो उपचारापुर्वी मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले.
सदर आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असल्याचे सुत्राकडुन समजले.
या घटनेमुळे रात्रभर पोलिस व महसुल प्रशासनात चांगलीच पळपळ झाली होती.
या बाबत सुविस्तर दोन वर्षापुर्वी तांभेरे राजेद्र लांडे याने एकादशीच्या दिवशी माळकरी आईला मटण बनवण्यासाठी हट्ट धरला होता.मात्र एकदशी असुन मी माळकरी आहे.मी बनवणार नाही असे म्हणल्याचा राग राजेंद्र याने येवुन आईच्या डोक्यात जबर मारहाण करुन खुन केला होता.
याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात मयताचा दुसरा  मुलगा दिगंबर लांडे यांनी ३०२ प्रमाणे खुनाची फीर्याद दिली होती.
आरोपी हा गेली महिन्याभरापासुन आजारी होता.
त्यास दोन आठवडेभरापुर्वी पुणे येथिल ससुन रुग्णालयात उपचार कामी दाखल केले होते.
यानंतर पुन्हा राहुरी येथे आणण्यात आले असता त्यास रात्री त्रास जाणवु लागला असता राहुरीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी प्रताप साळवे यांनी त्यास मयत घोषित केले.
घटनेची माहिती कळताच तहसिलदार फसियोद्दिन शेख,प्रांत अधिकारी दयानंद जगताप,पोलिस उपधिक्षक संदिप मिटके,
पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ,नायब तहसिलदार गणेश तळेकर,राहुरीच्या न्यायधिश सुजाता शिंदे,पोलिस उपनिरिक्षक मधुकर शिंदे,निलेशकुमार वाघ,अदिनाथ पाखरे,अमित राठोड,सचिन ताजणे अदि घटनेच्या ठिकाणी दाखल झाले होते.
मयत राजेंद्र लांडे याचे शवच्छेदनासाठी नगर येथे पाठवण्यात येणार असल्याचे समजले लांडे यास नेमक्या कोणत्या आजाराची बाधा होती याचे गुढ शवविच्छेदना नंतर समोर येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....