संक्रापुरचा सरपंच रामा पांढरे यांनी दोघांचे डोके फोडले` तर पांढरे टोळीकडुन गावात दहशत पसरविण्याचा प्रकार, पोलिसात 7.जणावर गुन्हा दाखल......

राहुरी /सार्वमंथन प्रतिनिधी
संक्रापुर येथिल सरपंच रामा पांढरे टोळीकडुन 8 ते 10 जणांना बेदाम मारहाण झाली आहे.
यामधे दोघे जण गंभिर जखमी झाले असुन त्यांच्यावर श्रीरामपुर येथे उपचार सुरु असुन याबाबत 7 जणांवर राहुरी पोलिस ठाणेत सार्वजनिक ठिकाणी लोक जमा करुन दहशत पसरवणे व मारहाण करणे या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिमेंटचे पाईप टाकण्याच्या कारणावरुन संक्रापुरच्या सरपंच रामा पांढरे व त्यांच्या 7 साथीदाराने दोन जणांचे लाकडी दांडे व दगडाने डोके फोडल्याची घटना घडली आहे.
याबाबत राहुरी पोलिस ठाणेत गु.रजि.नं.556/2021 भादवि कलम 324,337,323,143,147,148,149,504,506 प्रमाणे  राजेंद्र संजय जगताप वय वर्ष 24वर्षे,धंदा शेती राहणार संक्रापुर ता.राहुरी यांनी आरोपी 1) जाफर शेखलाल शेख 2) आखिल युसुफ शेख 3) रामदास बाळासाहेब पांढरे 4) आखिल शेख गारवाले 5) बाबासाहेब अंबिर शेख 6)ऋषीकेश बापु पांढरे सर्व रा.संक्रापुर ता.राहुरी पोपिज नानाभाई शेख रा.दवण गाव ता .राहुरी यांच्या विरोधात फीर्याद दाखल केली आहे.
सदर घटना हि  दि.14 जुलै 2021 रोजी लांडेवाडी सक्रापुर शिवारातील फिर्यादीच्या राहते घरासमोरील रस्त्यालगत घडली आहे. 
फिर्यादी हे त्याचे घरा समोर चालु असलेल्या रोडच्या कामा लगत उभे असतांना यातील आरोपीत  हे गैरकायद्याची मंडऴी जमवुन येवुन रोडचे चारीला सिमेंट पाईप टाकणेच्या जागेवरुन  फिर्यादीस व फिर्यादीचा भाऊ यांच्याशी वाद घालु लागले असता फिर्यादी वरील आरोपीत यांना समजावुन सांगत असताना आरोपी नं 1 यांनी तेथे पडलेला दगड हाता घेऊन फेकुन फिर्यादीचा चुलत भाऊ यांचे डोक्यात मारला तेव्हा त्याचे डोक्यास जखम झाल्याने व त्यातुन रक्त येवु लागल्याने फिर्यादी त्यास धरण्यासाठी गेला असात आरोपीत नं 3 याने त्याचे हातातील लाकडी काठीने फिर्यादीचे उजव्या कानाच्या जवळ मानेवर मारले व वरील आरोपीत यांनी फिर्यादीस व फिर्यादीचे चुलत भावास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फीर्यादीत राजेद्र जगताप यांनी म्हटले आहे.घटनेचा तपास संजय राठोड हे करत आहे.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....