राहुरी ग्रामिण रुग्णालयाचे लाखो रुपयचे वैद्यकीय साहित्य चोरी....घटना घडुन चार महिने उलटले असतांना अद्याप पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल नाही....

राहुरी /सार्वमंथन वृत्तसेवा
तत्कालिन काली राहुरीच्या ग्रामिण रुग्णालयासाठी उपोषण करणारे आत्ताचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या शहरातील बंद अवस्थेत असलेल्या ग्रामिण रुग्णालयातील लाखो रुपयाची वैद्यकीय साहित्याची चोरी  झाल्याने याबाबत चांगलेच चर्चेला उधान आले आहे.
राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत ठेवण्यात आलेले वैद्यकीय साहित्य एक्सरे चोरीस गेले आहे. याबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने वैद्यकीय सेवा ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती . गोरगरीब रुग्णांना मिळणारी मोफत वैद्यकीय सेवा बंद होऊ नये , यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष प्राजक्त ‌तनपुरे यांनी पुढाकार घेत राहुरी पालिकेच्या मालकीची अभ्यासिका इमारत ग्रामीण रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिली.पाच वर्षापुर्वी आर पी आय आठशले गटाचे विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामिण रुग्णालयासाठी उपोषण केले होते.
ग्रामीण रुग्णालयाचे दोन नोव्हेंबर २०१७ रोजी पालिकेच्या अभ्यासिका इमारतीत स्थलांतर झाले .
 त्यावेळी जुन्या इमारतीमधील जे वैद्यकीय साहित्य हलविणे शक्य नव्हते ,ते सुरक्षितपणे एका खोलीत ठेवण्यात आले होते . कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला . त्यामुळे या साहित्याकडे दुर्लक्ष झाले . दरम्यान , भुरट्या चोरांनी इमारतीमधील एके एक वस्तू चोरण्याचा सपाटा लावला . लाखो रुपयांच्या वस्तू हातोहात चोरी झाल्या . याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठले ; परंतु त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून पोलिसांनी प्रश्नांचा भडिमार केल्याने तक्रारदाराने डोक्याला हात लावला.याबाबत मा.खा. प्रसाद तनपुरे यांनी पोलिसांना सुचना केल्या तर  पोलिस उपधिक्षक संदिप  मिटके यांनी घटनेच्या ठिकाणी जावुन पाहणी करत या घटने बाबत दखल घेतल्याचे समजले आहे.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....