वाळू तस्करांचे आगार असलेल्या संक्रापुरचा सरपंच रामा पांढरे यांना कपडे फाटे पर्यंत 8 ते 10 जणांच्या टोळक्याने मारहाण केले आहे.....
वाळू तस्करांचे आगार म्हणून ओळख असलेल्या संक्रापुरचा सरपंच रामा पांढरे यांना 8 ते10 जणांच्या टोळक्याने लोखंडी फायटर,लोखंडी गज,लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजी नंबर 555/2021 भादवि कलम 324 ,323,143 ,147 ,148 ,149, 504, 506 प्रमाणे 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्त्याच्या कामाचा जाब विचारला असता 9 जणांनी गैर कायद्याची मंडळी जमून सरपंच रामा पांढरे यांना जबर मारहाण करत कुटुंबाला जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथे घडली आहे.
सदर घटनेमुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संक्रापुर लांडेवाडी येथे
दि.14 जुलै रोजी दुपारी 12 वाजे दरम्यान रामा पांढरे यांना1)संजय संपत जगताप 2)नबाजी राधाकिसन जगताप 3)सुरेश नारायण जगताप4)बाबुराव संपत जगताप5)ज्ञानदेव संपत जगताप6)गोकुऴ राधाकिसन जगताप7)अर्जुन भाऊसाहेब होण 8)राजेंद्र संजय जगताप9)नारायण गोकुळ जगताप सर्व रा. लांडेवाडी सक्रापुर ता.राहुरी यांनी जबर मारहाण केली.
रामा पांढरे व त्यांच्या बरोबर काही जण हे गावातील रोडचे काम पाहणे साठी आले असता वरिल लोकांनी गैरकायद्याची मंडऴी जमवुन येवुन पांढरे यांना म्हणाले की, तु येथे का आला असे म्हणाले असता फिर्यादी हे म्हणाले की, मी रोडचे काम कुठ पर्यत आले आहे.ते पाहणे साठी आलो आहे असे म्हणाल्याचा आरोपींना राग आल्याने आरोपी यांनी पांढरे यांना शिवीगाऴ करण्यास सुरुवात केली तेव्हा फिर्यादी हे आरोपी यांना म्हणाले की, तुम्ही शिवी गाऴ करु नका असे म्हणाले असता यातील आरोपी नं. 1 याने फिर्यादीचे डोक्यास लोखंडी फायटर मारले व आरोपी नं.2 याने लोखंडी गजाने फिर्यादीचे पायावर मारहाण करणेस सुरुवात केली असता यातील साक्षीदार हा त्याचे वाद सोडविण्यासाठी मध्ये आले असता फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांड्याने व लाथाबुक्कानी मारहाण करुन शिवीगाऴ करुन पुन्हा येथे आलातर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला जीवंत सोडणार नाही असा दम दिला आहे. सदर भांडणामध्ये फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची चैन व पाकीट गहाऴ झाले आहे.
पुढील तपास पो.ना जायभाय हे करीत आहे
Comments
Post a Comment