चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद... पो.नि.नंदकुमार दुधाळ

देवळाली प्रवरा /सार्व मंथन वृत्तसेवा
उद्योग व्यवसाय करता असताना  केवळ स्वतःची प्रगती न साधता समाजासाठी अहोरात्र सेवा करणारे चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी केले.
देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहास शुक्रवारी नंदकुमार दुधाळ यांनी भेट दिली प्रसंगी ते बोलत होते.यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, रफिक शेख, अशोक काळे, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे उपस्थित होते.
पुढे बोलताना पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ म्हणाले की, समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड ही ठराविक लोकांमध्ये आहे. याच पद्धतीने गणेश भांड यांचे काम आहे. उद्योग व्यवसायाबरोबर सामाजिक, धार्मिक कार्यातील गणेश भांड यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.कोरोना संकट काळातील योगदानाबद्दल श्री.दुधाळ यांनी गणेश भांड यांचा गौरव केला. उद्योजक गणेश भांड यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषदेचा भारतरत्न जे.आर.डी. टाटा उद्योग विभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
यावेळी ग्रामीण पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गौरव पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ व गणेश भांड यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी गोविंद फुणगे, शरद पाचारणे, संतोष जाधव, अनिल कोळसे,आकाश येवले, विजय भोसले, संदीप पाळंदे, कमलेश विधाटे, सचिन पवार आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले तर आभार ऋषि राऊत यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....