प्रसाद शुगर कारखान्याचा हंगाम २०२१-२२ चा रोलर पूजन मान्यवरांच्या उपस्थित संपन्न”

वांबोरी/सार्वमंथन प्रतिनिधी
गुरुवार दिनांक 8 जुलै  रोजी वांबोरी येथील प्रसाद शुगर अँण्ड अँलाईड अँग्रो प्रोडूक्टस लिमिटेड या कारखान्याचा हंगाम २०२१-२०२२ करिता मिल रोलरपूजन समारंभ झाला.यावेळी  कारखान्याचे जेष्ठ संचालक सुरेश बाफना यांच्या शुभहस्ते पुजन संपन्न झाले. 
यावेळी कारखान्याचे  कार्यकारी संचालक सुशीलकुमारजी देशमुख यांनी सांगितले कि मागील हंगाम सन २०२०-२०२१ चे ऊस उत्पादक, उस तोडणी-वाहतूकदार यांची एफआरपी सह संपूर्ण ऊस बिल देणी व तोडणी-वाहतूक देणी वेळेत अदा केली आहेत त्यामुळे उत्पादक,आणि तोडणी-वाहतूकदार यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण असून  गळीत हंगाम २१-२२ साठी शेतकऱ्यांचा ऊस वेळेत ऊसतोड होण्याच्या दृष्टीने सक्षम तोडणी-वाहतुक यंत्रणा करार द्वारे पूर्ण भरती केलेली आहे. 
तसेच चालू हंगाम २०२१-२०२२ सुरु करण्याच्या अनुषंगाने मशिनरी रीपेअरिंग,ओवर ऑईलींग, जलद गतीने सुरु असून ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. या गाळप हंगामात 8 लाख में.टन ऊस गाळपाचे उदिष्ट् ठरवलेले असून कारखाना दैनंदिन गाळप क्षमता 5000 में.टन गाळप करण्यास सज्ज आहे तसेच 30 के.एल.पीडी क्षमतेचा आसवानी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून ऑक्टोबर अखेर प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक सुशीलकुमारजी देशमुख यांनी दिली आहे.“कारखान्याचे जेष्ठ संचालक  सुरेश बाफना म्हणाले की या गळीत हंगामात कारखान्याचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे  यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख  यांच्या काटेकोर नियोजनातून उच्चांकी 8 लाख में. टन पेक्षा जास्त गाळप करण्याचे उदिष्ट् ठेवलेले आहे.”
या कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे चीफ जनरल मॅनेजर श्री.आभाळे व्ही.आर, वर्क्स मॅनेजर श्री.म्हस्के एस.ए. जनरल.मॅनेजर(प्रोसेस) श्री.माने,लेखाविभागाचे श्री.सूर्यवंशी,फुगारे, शेतकी अधिकारी श्री.घुगरकर, मा.काकडे, पर्चेस विभागाचे श्री.पाटील,दळवी, सुरक्षा श्री.वाघमारे, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे श्री.पाटिल आणि सर्व खातेप्रमुख,कर्मचारी अदि कार्यक्रमास उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....