राहुरी तहसिल कार्यालयातील पी यु पी कोसळला महिला नायब तहसीलदार बालबाल बचवल्या.......उद मांजर सद्रुष्य प्राण्याचा राहुरी तहसील कार्यालयात धुमाकुळ...

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
अचानक राहुरी तहसील कार्यालयातील पी.यु.पी  कोसळल्याने महिला नायब तहसीलदार बालबाल बचावल्या ने महसूल प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.
याबाबत सुविस्तर वृत्त राहुरी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पुनम दंडेले या आपल्या टेबल जवळील खुर्चीवर बसल्ता असता अचानक तहसील कार्यालय वरिल असलेला पी.ओ.पी कोसळला. 
पी.यु.पी  खुर्ची जवळ पडल्याने त्या काही काळ नायब तहसिल स्तब्ध झाल्या होत्या.अचानक काहीतरी मोठा आवाज आल्याने तहसील मधील बहुतेक सर्वच महिला व पुरुष कर्मचारी यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली.
सर्वानी  वर बघितले असता उद मांजर सद्रुष्य प्राणी पी.यु.पी वरिल भागात पळापळ करत होते.
अनेकांना उदमांजर  पळतांना दिसले नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी तत्काळ वन विभागाची संपर्क करत वन विभागाच्या कर्माचारयास पाचारण केले.
वन विभागाचे कर्माचारी लांबे, दत्तु गायकवाड यांनी येवुन पाहणी केली असता  उदमांजर सद्रुष्य प्राणी हे गेली दोन वर्षापासून या ठिकाणी वावरत असून या उद मांजराने तहसीलच्या अनेक कर्मचाऱ्यांना दर्शन दिले आहे.
अधिक माहिती अशी समजली की उद मांजरा विषयी अनेक वेळा वन विभागाला महसूलने कळविले असता याकडे वन विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
नायब तहसीलदार यांच्या डोक्यात जर पी.यु.पी पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती वन विभागाने एका सर्प मित्रास बोलवुन पिंजरा लावण्यासाठी सांगितले आहे.
वन विभाग याकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत असुन जर मोठी दुर्घटना घडल्यास वन विभागास जबाबदार धरले जाणार असल्याचे तहसिल कार्यालयातील कर्मचारी बोलत होते.
या उद मांजराचा कधी बंदोबस्त होणार याकडे महसुल कर्मचारयाचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....