टाकळीमिया येथे ढंपरच्या धडकेत एक तरुण जागिच ठार..राहुरी पोलिसात गुन्हा दाखल....


राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील 40 वर्षिय तरुणास भरधाव वेगाने माती वाहतुक करणारया ढंपरने  चिरडल्याची दुर्दवी घटना दि.4 जुलै रोजी दुपारी 3.वाजे दरम्यान  घडली आहे.
सदर घटनेमुळे या परिसरात संतपाची लाट पसरली आहे.
घटनेची माहिती कळताच पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी घटनेच्या ठिकाणी जावुन पाहणी करत गुन्हा दाखल करण्यास सांगितले.
टाकळीमिया येथील तरुण परितोष रामचंद्र कुलकर्णी वय वर्ष 40 हे महादेव मंदिर जवळुन आपल्या घराकडुन जात असतांना अचानक मातीने भरलेल्या ढंपर क्रमांक एम एच 17 ऐ जी 5045 पाठीमागुन भरधाव वेगात येवुन ढंपर चालक बाळासाहेब रघुनाथ राउत यांने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत हायगईने वाहन चालवत कुलकर्णी यांच्या मृत्युस कारणीभुत ठरला आहे.सदर घटने बाबत राहुरी पोलिस ठाणेत मयताचा भाउ परिमल रामचंद्र कुलकर्णी यांनी 304,279,337,338,134 अ.134 ब,177 प्रमाणे ढंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
कुलकर्णी यांच्या डोक्यावरुण गाडीचे चाक गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेदा झाला होता ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.त्यांना राहुरी ग्रामिण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी कुलकर्णी यांना मृत घोषित केले. 

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....