पोलिसांची जनता देशी दारु दुकानावर कारवाई..


राहुरी/सार्वमंथन वृतसेवा
राहुरी शहरातील आझाद चौक परिसरामध्ये असलेल्या जनता देशी दारू दुकानातुन दारू विक्री होत असल्याने राहुरी पोलिसांनी या ठिकाणी जावुन सदर दुकानावर छापा टाकला . पोलिसांना पाहाताच ग्राहकांनी धुम ठोकली .
या कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क ला अहवाल पाठवणार असल्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी सांगितले . आज मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान राहुरी शहरात पो . नि.नंदकुमार दुधाळ सह पो . कॉ . अदिनाथ पाखरे , किरण ठोंबरे , शिवाजी खरात आदिंच्या पथकाची पोलिसांची गस्त सुरू असताना दारू दुकानाबाहेर काही ग्राहकांची गर्दी असल्याचे निदर्शनास आले मात्र पोलिस गाडी पाहताच सदर ग्राहकांनी या ठिकाणाहुन धुम ठोकली मात्र पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पोलिसी खाक्या दाखवत माजी नगरसेवकाला चांगलेच खडे बोल सुनावले.
सध्याच्या काळात गोरगरिबांना वैद्यकीय मदत लोकप्रतिनिधींनी करण्याचे सोडुन असे उद्योग करता का? असे पोलिस निरिक्षक
दुधाळ यांनी दारू दुकानदारास सांगत चांगलीच कान उघडणी केली. जर कुनी शहरात व तालुक्यात हात भट्टी दारू विक्री केली तर याद राखा जेथे दारू विक्री होत असेल तेथील पोलिस कर्मचा - याला जबाबदार धरले जाईल असा सज्जड इशाराही यावेळी दुधाळ यांनी दिला . तर या देशी दारू दुकानदाराचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठवणार असुन कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याचे पो नि. दुधाळ यांनी म्हटले आहे .


Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....