राहुरी शहरासह विद्यापीठ, वांबोरी परिसरामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तहसील-पोलिस पथकाची धडक कारवाई.
गोविंद फुणगे/ राहुरी सार्व मंथन
पंधरा दिवस जनता कर्फ्यू चा आदेश आल्यानंतर देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर उपविभागीय प्रांतअधिकारी दयानंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, राहुरी पालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुर्हे यांनी यांच्या संयुक्त पथकाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.
वांबोरी येथे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या देणाऱ्या सुधीर नागपाल या मेडिकल दुकानदारांवर पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.तर महात्मा फुले कृषी विद्यापीठासमोर असणाऱ्या फळ विक्रेत्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
येथीलच असणा-या विद्यापीठात कॅनाल ला पोहणा-या तरुणावर देखील हि कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळपासून या संयुक्त पथकाने ठिकठिकाणी धडक कारवाई केली आहे.यापुढे देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येईल त्यामुळे नागरीकांनी देखील नियमांचे तंतोतंत पालन करावे अन्यथा कारवाईला सामोरं जावं असा इशारा देखील या पथकाकडून देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment