राहुरी येथे पिंजरयात बिबट्या कैद' वन खात्याचे कर्मचारी उशीरा आल्याने नागरीकांनी व्यक्त केली नाराजी..

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
नागरीकांच्या मागणी नुसार वन विभागाने लावलेल्या पिंजरयात बिबट्या अलगदपणे  अडकल्याची  घटना घडली आहे.
राहुरी शहरातील नगर मनमाड रोड लगत एस आर हाॅटेल समोर सातभाई वस्ती परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजरयात बिबट्या अलगद अडकला मात्र बिबट्या पिंजरयात आडकवुन दोन तासाचा कालावधी उलटला असतांनाही वन विभागाचे कोणीही कर्मचारी घटनेच्या ठिकाणी फिरकले नाही.
गेली अनेक दिवसापासुन या परिसरात बिबट्याने मोठा  उच्छाद मांडले होता.
राहुरी पालिकेचे नगरसेवक गजानन सातभाई यांच्या मळ्यातील शेतकरयांच्या शेळी, बोकड बिबट्याने काही दिवसापुर्वी फस्त केल्या होत्या तसेच गेली अनेक दिवसापासुन या भागातील शेतकरयांची मागणी होती की बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरया लावावा तोच दोन दिवसापुर्वी या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. आज सोमवार दि  १९.ऐप्रिल रोजी बिबट्या रात्री ७.वाजे दरम्यान पिंजरयात आडकल्याने या भागातील शेकरयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पिंजरयात अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी येथे नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
मात्र दोन तासापेक्षा जास्त कालावधी झाला असतांनाही वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी घटनेच्या ठिकाणी फिरकले नसल्याने नागरीक व शेतकरयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राहुरीचे वनक्षेत्रपाल परदेशी यांच्याशी संपर्क केला असता कर्मचारी रवाना झाले आहे. तर सरकारी गाडी गस्तीवर असल्याचे सांगण्यात आले.

 

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....