कुटुंबा समोर वडिलांना मारहाण मुलगी वाद सोडविण्यासाठी गेली असता तिच्यावर ब्लेडने वार.. राहुरीतील घटना....
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
पंकज खपके यांना आरोपी मारहाण करत असताना त्यांची पत्नी व मुली भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण करून ब्लेडने वार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथे दिनांक 1 एप्रिल रोजी घडली आहे. पंकज दगडु खपके वय 43 वर्षे धंदा मजुरी, रा. लाख रोड टाकळीमियॉ ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. 1 एप्रिल रोजी सायं साडेसात वाजे दरम्यान फिर्यादी पंकज खपके त्यांच्या घरासमोर असताना आरोपी हे फिर्यादीचे घरासमोर मोटार सायकलवर बसून आले. आणि फिर्यादीस मारहाण करू लागले. यावेळी फिर्यादीची पत्नी व मुली मनिषा, सोनाली व प्रांजली हया घराबाहेर आल्या असता त्यांना पण आरोपींनी चापटीने व चप्पलाने मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीची मुलगी मनिषा हिला आरोपी पप्पु जगधने याने ब्लेडने डाव्या हाताच्या तळव्यावर मारहाण करुन शिवीगाळ केली. जाताना फिर्यादीस व फिर्यादीचे पत्नी मुलीना आरोपी म्हणाले कि, आता कमी मारहाण केली. नंतर जास्त मारहाण करु. अशी धमकी दिली. पंकज दगडू खपके यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी 1) दामु जगधने 2) पप्पु जगधने 3) अनोळखी इसम 4) हिराबाई जगधने व दोन अनोळखी महिला अशा एकूण सहा जणांवर गु. रजि. नं. व कलम - 1 277/2021 भादवि कलम 324,143, 147, 148 प्रमाणे मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार संजय पठारे हे करीत आहेत.
Comments
Post a Comment