राहुरीत प्रभागनिहाय कोविड लसीकरण करण्यात यावे /भा ज पा युवा शहराध्यक्ष अजित डावखर
राहुरी/ सार्वमंथन वृत्तसेवा
राहुरी शहरात प्रभागनिहाय कोविड लसीकरण करण्यात यावे अशी मागणी (भा.ज.पा.युवा शहराध्यक्ष अजित डावखर यांनी तहसिलदार यांना निवेदन देत मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत असून त्याप्रमाणात कोविड लसीकरण कमी प्रमाणात झालेले आहे. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा भाग आहे. राहुरी शहरात लसीकरण पूर्ण करण्यासाठी राहुरी शहरातील प्रत्येक प्रभाग निहाय कोविड लसीकरण करणे आवश्यक आहे. याकामी स्वयंसेवक म्हणून मदत करणे कामी भाजपा कार्यकर्ते तयार आहेत. त्यामुळे राहुरी शहरात त्वरित प्रभाग निहाय कोविड लसीकरण करण्यात यावे अशी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाची
प्रत- १)माजी आ. शिवाजीराव कर्डिले
२)मां.खासदार सुजय दादा विखे-पाटील
३)वैद्यकीय अधिकारी, राहुरी ग्रामीण रुग्णालय, राहुरी.
Comments
Post a Comment