मंत्री प्राजक्त तनपुरे ऑक्सिजन निर्मि तीमुळे ठरले संकटमोचन...
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
ऑक्सिजन हा संपुर्ण महाराष्ट्रात चर्चाचा विषय ठरला होता.मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऑक्सिजन निर्मीतीची शक्कल लढवत यास पुर्ण विराम दिला आहे.वैद्यकिय सेवा देणारयांना भटकंती करावी लागत असल्याचे पाहून आपणच जर ऑक्सिजन निर्मिती केली तर असा मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मनात विचार आणला आण आता अहमदनगर जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार आहे.
आज अहमदनगर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.कोरोनाचे संकटात संपूर्ण राज्यभर ऑक्सिजनचा प्रचंड मोठा तुटवडा भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ४०० लिटर पर मिनिट ऑक्सिजन निर्माण करणारा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू होणार आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन ची कमतरता भासणार नाही.आणि रुग्णांना ऑक्सिजनसाठी वणवण फिराव लागणार नाही .गेले कित्येक दिवस जिल्ह्यात साधारण ४० टन ऑक्सिजन बाहेरून आणण्यात येतोय त्यामुळे हा प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे मागील वर्षापासून कोरोना च्या बाबतीत सकारात्मक काम करताना दिसून येत आहेत.कोरोनाच्या महामारीतही मंत्री तनपुरे हे कायम रुग्ण व वैद्यकीय सेवा बाबत सकारात्मक भमिका घेतांना दिसत आहे.तर वेगवेगळ्या उपयोजना राबवत आहे.त्याचाच एक भाग म्हणजे ऑक्सिजन निर्मिती करण्यास पुढाकर घेणे,कोविड सेंटरला जावुन तेथे पाहणी करत तेथे सुचना करणे,वैद्यकीय सेवा बाबत सुचना करणे, रुग्णांची विचारपुस करणे,जिल्हाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तहसिलदार यांची बैठक घेवुन सुचना करणे यामुळे मंत्री तनपुरे कायम चर्चेत राहिले आहे.
Comments
Post a Comment