अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध ; काय चालू व काय बंद राहणार!

अहमदनगर/सार्वमंथन वृतसेवा
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेत या बैठकीनंतर जिल्ह्यामध्ये नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करत कठोर निर्बंध लावण्याचे सांगत याबाबत जिल्हाधिकारी सुधारित आदेश काढतील असे सांगितले होते. पालकमंत्री यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
यामध्ये म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा हद्दीमध्ये रविवार दि. 18 एप्रिलच्या रात्री 12 वाजल्यापासून ते शनिवार दि. 1 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत कठोर निर्बंध घातले आहेत. यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय व अस्थापना बंद असणार आहेत. मात्र काही अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी निर्धारित वेळ देण्यात आला आहे. ही वेळ सकाळी 7 ते 11 अशी राहणार आहे. या आदेशानुसार किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री (फक्त द्वार वितरण), फळे विकी (फक्त द्वार वितरण), अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्रीची दुकाने, कृषी संबधित सर्व सेवा अथवा दुकाने, पशुखाद्य विक्रीची दुकाने, पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांना पेट्रोल/ डिझेल/ सीएनजी/ एलपीजी गॅस विक्री सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवता येणार आहे. तर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा, मालवाहतूक या करीता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार सुरू ठेवता येणार आहे. तर हॉटेल रेस्टॉरंट, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई आहे. मात्र होम डिलेवरी चालु राहील. तसेच धार्मिक स्थळे, आठवडे बाजार, दारु दुकाने पुर्णता बंद राहील. टॅक्सी, कॅब अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील. चार चाकी वाहने अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहतील. दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींसाठी अत्यावश्यक सेवेसाठी वापरास परवानगी राहील. सर्व खाजगी कार्यालये पूर्णपणे बंद राहतील. कटींग, सलून, स्पा बंद राहतील. शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी क्लासेस पूर्णतः बंद राहतील. स्टेडिअम, मैदाने पुर्णतः बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. चहाची टपरी पुर्णतः बंद राहतील. सिनेमा हॉल, नाट्यगृह, संग्रहालय बंद राहतील. सर्व प्रकारची खाजगी बांधकामे पूर्ण बंद राहतील. सेतू, ई-सेवा केंद्र पुर्णतः बंद राहतील. बेकरी, मिठाईची दुकाने बंद राहतील. विवाह समारंभासाठी पूर्णतः बंदी राहील.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....