शिर्डीच्या वाहतूक शाखेची लाचखोरी चव्हाट्यावर..! पोलीस दादा अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात.. ;

शिर्डी / विशेष सार्वमंथन 
साई नगरीतील शिर्डी वाहतूक शाखेत परराज्यातुन येणाऱ्या साई भक्तांना व सर्व सामान्य वाहनचालकांना वेठीस धरण्याचे काम सुरु असुन काही दिवसांपुर्वी शिर्डी वाहतूक शाखेबाबत वरिष्ठ अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना तक्रारी करण्यात आल्या होत्या.
मात्र याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सफशल दुर्लक्ष केल्याने अखेर हाप्ते घेणारा वाहतूक पोलिस दादा लाच स्वीकारतांना लाचलुचपतच्या जाळ्यात अलगद अडकल्याने शिर्डीच्या वाहतूक शाखेची लाचखोरी उघड झाली असुन यामधे वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यास आरोपी करावी अशी मागणी यापूर्वी करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याच्या विरोधात नाशिक अॅन्टी करप्शन कडे तक्रार करण्यात येणार असल्याचे समजले आहे.
याबाबत सविस्तर  शिर्डी ते नगरसूल दरम्यान तीन खासगी वाहनांना प्रवाशी वाहतूक करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे साडेतीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून काल मंगळवारी शिर्डी पोलीस स्टेशनसमोर साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस नाईक प्रकाश दशरथ पिलोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयाच्या पथकाने रंगेहात पकडले.
याबाबत लाचलुचपत विभागाच्या वतीने सांगण्यात आले, की तक्रारदाराच्या तक्रारीवरुन लाच लुचपत विभागाच्या नाशिक कार्यालयाच्या पथकातील अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी करून सापळा लावला. कारवाई दरम्यान शिर्डी शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या शहर वाहतूक शाखेचा पोलीस नाईक प्रकाश दशरथ पिलोरे याने तक्रारदारांकडे ३ हजार ५०० रूपये लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम मंगळवार दि. १३ जून २०२३ रोजी शिर्डी पोलीस ठाण्याच्या समोर पिलोरे याने स्वीकारली. ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या नाशिक कार्यालयातील पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र शर्मिष्ठा घारगे (वालावलकर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव यांच्यासह सहकाऱ्यांनी केली आहे. या कारवाईनंतर शिर्डीतील वाहतूक शाखेत चांगलाच संन्नाटा पसरला होता.काही आपल्या कारवाई होईल या भितीने मोबाईल बंद केले तर काही दादा मिस्टर इंडिया झाले.


चौकट...
दैनिक सार्वमंथनमधे शिर्डी च्या वाहतूक पोलिसांच्या वसुलीचे वृत्त दोन आठवडेपुर्वी प्रसिद्ध झाले होते.
या वृत्ताने वाहतूक शाखेतील अधिकाऱ्याच्या पायाखालीची वाळु सरकली होती मात्र तरीही भाविकांकडून व सर्व सामान्य वाहन चालका कडुन छुप्या पद्धतीने वसुली सुरू असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे.
साई नगरीत किती वाहन चालकांकडुन हप्ते घेतले जात होत? महिन्या काठी किती वसुली होते?या वसुलीतील हिस्सा कोणा कोणापर्यत पोहच होतो? अशा वेगवेगळ्या चर्चाला शिर्डी सध्या उधान आले आहे.



Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....