राज्यमंत्री तनपुरे झाले नगरचे पालक मंत्री?

राहुरी/सार्वमथन वेब
गेली अनेक दिवसांपासून कथ्थाकुट सुरू असलेल्या नगर जिल्ह्याच्या नूतन पालकमंत्री निवडीसाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नावांची चर्चा आहे. मात्र, यात पाथर्डी नगर मतदार संघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर आले आहे. 
दरम्यान, आज बुधवारी नूतन पालकमंत्र्यांची घोषणा झाली, तर नगरची उद्या गुरुवारी होणारी नियोजन समितीची बैठक ही नूतन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. परंतु, मध्यंत्तरी त्यांनी नगरच्या पालकमंत्री पदाच्या आपल्यावरील जबाबदारीबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती.
तेव्हापासून नगरला नवीन पालकमंत्री दिला जाणार, अशी चर्चा सुरू होती. यामध्ये नगरचा अनुभव असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यापाठोपाठ नगरमधून मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, निलेश लंके आदी नावांचीही चर्चा होती. मुुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री निवडीबाबत वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे. यामध्ये मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पुढे येत आहे. शिवाय, कोणत्याही क्षणी या नावाची घोषणा होऊ शकते, असेही विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.
मात्र सध्या प्राजक्त तनपुरे समर्थकांनी सोशल मीडियावर जल्लोष करत प्रत्येकाने सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केल्याचे दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....