जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव, दहा जणांचा होरपळून मृत्यू''


अहमदनगर/ सार्वमंथन प्रतिनिधी

राज्यातील शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना काही थांबत नसल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना समोर आलीय. आगीच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तण्यात आलीय. तर, काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

पाच जणांचा मृत्यू आणखी काही जण भाजल्याची शक्यता

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्यानं सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आगीत काही रुग्ण भाजल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. रुग्णालयात अग्निशमन दल पोहोचले असून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रुग्णालयाला लागलेल्या आगीत अनेक जण भाजले असल्याची शक्यता असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. रुग्णालयाच्या तळमजल्यावर आग लागली. आग कशामुळं लागली याचं कारण अस्पष्ट जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही.यानिमित्त शासकीय रुग्णालयातील आग प्रतिबंधक यंत्रणांच्या कार्यक्षमतेचा मुद्दा निर्माण झालाय. 20 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत 20 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. आयसीआयूला लागलेल्या आगीत 12 ते 15 जण जखमी झाले असून सहा जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांनी दिली आहे.

अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीनं कोल्हापूरहून नगरकडे निघाले आहे.

चौकट...

१० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत रामकिसन विठ्ठल हरपुडे( वय ७०),  सिताराम दगडू जाधव (८३),  सत्यभामा शिवाजी घोडचौरे( ६५)य,  कडूबाळ गंगाधर खाटीक (६५),  शिवाजी सदाशिव पवार (८२) , दीपक विश्वनाथ जेडगुले (५७),  कोंडाबाई मधुकर कदम (७०),  आसराबाई नांगरे (५८ ), छबाबी अहमद सय्यद (६५) व एक अनोळखी  अशा दहा जणांचा मृत्यू झाल्यांची नावे आहेत. यामध्ये चार महिला व सहा पुरुष अशा दहा जणांचा समावेश आहे. 
जिल्हा शासकीय रुग्णालयाला आग नेमकी कशामुळे लागली हे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग अटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक दलाने शर्तीचे प्रयत्न केले. आग नेमकी कशामुळे लागली हे कारण स्पष्ट नसले तरी प्रशासनाकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी जिल्ह्यातुन होत आहे.


Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....