जात पडताळणीसाठी ४० हजारांची रक्कम स्वीकारणारया राहुरीत खाजगी दलालास रंगेहाथ पकडले...



राहुरी/सार्वमंथन प्रतिनिधी
जात पडताळणी करण्यासाठी ८० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दलालास नासिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने चाळीस हजार रुपये स्वीकारतांनी रंगेहात पकडले आहे.
आज विजयादशमी च्या दिवशी सर्व शासकीय कार्यालयास सुट्टी असतांना हबिब शेख या दलालाने राहता तालुका येथील एका इसमास जात पडताळणी करण्यासाठी ८० हजार रुपयाची मागणी केली होती.
अरे आज चाळीस हजार रुपये देण्याचे ठरले होते.
दरम्यान राहुरी शहरातील स्टेशन रोड येथील हॉटेल गागरे येथे नाशिक विभागाच्या पथकाने शेख यास चाळीस हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. 
पैसे स्वीकारणारा हा अल्पसंख्यांक समाजाचा तर देणाराही अल्पसंख्याक समाज्यातील असल्याने लाचलुचपत विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुस्लिम धर्मीयांचा वेश धारण करून सापळा रचला होता. सदर कारवाई नाशिक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली नगर लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.
या खाजगी दलालाने कोणाच्या मार्फत रक्कम मागितली होती का?  यामध्ये कोणी सरकारी कर्मचारी आहे का ? याचा शोध सदर पथक दुपारी उशिरापर्यंत घेत होते.सदर कारवाई पोलीस उपधिक्षक खेडकर, पोलीस निरीक्षक सपकाळे, पोलीस नाईक रमेश चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र निमसे वैभव पांढरे, चालक पोलीस हवालदार हारुन शेख यांनी ही कारवाई केली.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....