श्रीरामपूर / सार्व मंथन कुठलेही सामाजिक कार्य हे निर्पेक्ष असले पाहिजे,त्यात कुठलाही स्वार्थ,जोर-जबरदस्ती किंवा मी म्हणेल तसेच न करता व वागता सामाजिक कार्य एक कार्यशिलतेने परीपूर्ण निस्पृह असले पाहिजे,जसे एखादे विशाल वटवृक्ष असते,भर उन्हात त्याच्या सावलीखाली अनेक गरजवंत पशु,पक्षी,मानव येतात, बसतात,जरासा विसावा घेतात तथा उन कमी झाले अथवा मार्गस्थ होण्याची वेळ आल्यावर मार्गस्थही होतात,त्या बदल्यात त्या विशाल वटवृक्षास त्या सावली घेणाऱ्यांकडून काय अपेक्षा असते ? तसेच एक थंड पाण्याच्या विहिरीचेही असेच काही असते ज्यावेळी मानव,पशू,पक्षी यांना तहान लागते तेव्हाच ते या थंड पाण्याच्या विहिरीजवळ येतात आणि पाणी पेऊन आपली तहान भागवितात त्याबदल्यात ती विहिरी त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवते ? असेच निस्पृह समाजसेवेचेही असते,ज्यावेळेस लोकांना तुमची गरज वाटते,आवश्यक्ता भासते त्यावेळी ते आपल्याकडे येतात, आवश्यकतेनुसार थांबतात आणि मार्गस्थही होतात,जसे विशाल वटवृक्षाकडे गार सावली असते,विहिरीकडे थंड पाणी असते त्याप्रमाणेच एका समाज सेवकाकडे निस्पृह समाजसेवा असते,कधी स्वत:हुन तर कधी स...
Comments
Post a Comment